Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!
नांदेड/देगलूर (गोविंद मुंडकर) राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा — तिन्ही स्तरांवर लोकप्रतिनिधी असलेला देगलूर मतदारसंघ... पण शिक्षणाच्या मंदिराची अवस्था पाहून कोणालाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जिल्हा परिषद हायस्कूल, देगलूर, आज शिक्षणाचं केंद्र नसून अस्वच्छतेचं आणि दुर्गंधीचं केंद्र बनली आहे.
शाळेच्या बाहेरील भिंतींवर लघवी, आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, आणि वर्गांच्या परिसरात पसरलेली दुर्गंधी — अशा परिस्थितीत शेकडो विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. शाळेच्या भिंतींना सार्वजनिक शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज १०० ते २०० नागरिक शिक्षणासाठी नव्हे तर लघवीसाठी या शाळेत येतात, ही अतिशय संतापजनक बाब आहे.
ही शाळा त्या भागातील आहे जिथे राज्यसभेत अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे, लोकसभेत रवींद्र चव्हाण, आणि विधानसभेत जितेश अंतापुरकर हे प्रतिनिधित्व कर...
