Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग
हिमायतनगर (अनिल मादसवार) मागील पाच वर्षांपासून रखडलेली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अखेर रंगात येताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी तब्बल १६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. चार दिवस शांत असलेले वातावरण अचानक गजबजले आहे आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत.
★ उमेदवारीसाठी मनधरणी, दबाव-तणाव आणि पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली - हिमायतनगरमधील सर्व १७ प्रभागांत इच्छुकांची भिस्त वाढलेली असून, काहीजण वरिष्ठ नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तर अनेक जण आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत वजन वापरत आहेत. ज्यांना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे, ते दोन–तीन पक्षांतून तिकीट मागत आहेत. काहींनी तर पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याचे समजते. त्यामुळे अनेक...
