NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठा, रस्त्यालगत असलेले वीज पोल, डीपी हलविणे, वाढते वीजबिल तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. आणि अनधिकृत पद्धतीने केलेल्या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ९ मार्चपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर बेमुदत आमरण उपोषण करत असून त्यांच्या सहकाऱ्यांचा व अनेक शेतकऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.
शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. एक्सप्रेस फीडर ३३ केव्ही लाईन शहर व गावाजवळून गेल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ती लाईन सुरक्षित अंतरावर हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील काही ठिक...
