Friday, June 26

Tag: Murlidhar Dhage

MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

क्राईम, नांदेड
उस्माननगर (माणिक भिसे) रेती तस्करीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेल्या येळी (ता. लोहा) येथील कुख्यात रेती तस्कर मुरलीधर प्रकाश ढगे यास एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुरलीधर ढगे हा गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररीत्या रेती उपसा करून त्याची चोरटी विक्री करत होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकारही तो करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कारवाईचा प्रस्ताव श्री. संजय निलपत्रेवार, सहायक पोलीस निरीक्षक, उस्माननगर पोलीस ठाणे यांनी तयार केला होता. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गु...
error: Content is protected !!