Friday, June 26

Tag: Municipal Commissioner Dr. Doifode took notice and immediately turned on the electric lights.

Dr. Doifode ; मनपा आयुक्त डॉ.डोईफोडे यांनी दखल घेऊन तात्काळ विद्युत लाईट केली चालू..

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l एन डी 31 हडको सिध्देश्वर मंदिर या भागातील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने लाईट चालू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली होती परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिव महासंग्राम युवा जिल्हा अध्यक्ष आनंद जाधव पाटील यांनी निवेदनाद्वारे आयुक्त मनपा नांदेड यांच्या कडे केली होती निवेदनाची दखल घेऊन तात्काळ लाईट चालू करावे असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. हडको सिध्देश्वर मंदिर येथे पोल क्रमांक TF44 या पोलवर नविन लाईट बसवण्यात साठी नागरिकांनी मागणी केली होती, त्याठिकाणी बंद पडलेले लाईट व नवीन लाईट ची मागणी निवेदनाद्वारे केली होती म्हणून आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे लगेच त्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विद्युत विभागाच्या अधिकारी यांना सुचना देऊन पाहणी करण्यासाठी पाठविले असून या ठिकाणी लाईट बसविण्यात येणार आहेत, आयुक्त यांच्ये आभार मानले आहे....
error: Content is protected !!