Friday, June 26

Tag: Life-threatening attacks

Vanchit : ओबीसी नेत्यांवर जीवघेणे हल्ले – वंचित बहुजन आघाडीचा इशारा हल्ले थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार!

Vanchit : ओबीसी नेत्यांवर जीवघेणे हल्ले – वंचित बहुजन आघाडीचा इशारा हल्ले थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार!

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई /नांदेड| ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या नेत्यांवर मराठा समाजातील गुंड प्रवृत्तींकडून होत असलेले हल्ले आता असह्य झाले आहेत! प्रा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ आबा वाघमारे आणि कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. २३ सप्टेंबर रोजी वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ गाडी पेटवली गेली, तर २७ सप्टेंबर रोजी प्रा. हाके यांच्यावर दहा-बारा गुंडांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली. या आधीही बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हाके यांच्यावर हल्ला झाला होता. परभणी येथे कार्यकर्ते करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा हात-पाय फ्रॅक्चर झाला आहे. ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आ...
error: Content is protected !!