Breaking EVMs, taking videos of voting costly : ईव्हीएम फोडणे, मतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात; गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट -NNL
• जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा
• सायबर संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अधिक
• नागरिकांनी अतिशय सावधतेने समाज माध्यमांवर व्यक्त व्हावे
नांदेड, अनिल मादसवार| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीदरम्यान समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होईल अशा पोस्ट करू नका. कारण समाज माध्यमांवरील पोस्ट हा सबळ पुरावा मानल्या जातो. तसेच आचारसंहिता भंग करण्याचे गुन्हे कोणीही गृहित पकडू नयेत. या प्रकरणात शंभर टक्के शिक्षा भोगावी लागते. त्यामुळे या काळात आचारसंहितेचे सक्त पालन करा. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा स्वरुपाचे 23 गुन्हे न्यायप्रविष्ट असून या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भातील आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल उशिरा घेतला.
यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी विशेषत: जिल्ह्यातील तरुणांना आवाहन करताना सोशल मिडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन केल...
