Sunday, June 28

Tag: Kamtha Kh. Ravidas Jayanti here

Ravidas Jayanti ; कामठा खु. येथे रविदास जयंती, भाषणाऐवजी कृती कार्यक्रम !

Ravidas Jayanti ; कामठा खु. येथे रविदास जयंती, भाषणाऐवजी कृती कार्यक्रम !

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l येथून जवळच असलेल्या कामठा खु. (गाडेगाव) ता. जि. नांदेड येथील महामार्गावरील नियोजित गुरु रविदास मंदिराच्या जागेवर ध्वजारोहण करुन क्रांतीकारी महामानव गुरु रविदासांची ६२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि ज्येष्ठ सामाजिक नेते व्यंकटराव दुधंबे यांच्या हस्ते सर्वप्रथम गुरु रविदासांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पिवळ्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळेस गोविंद माऊली पार्डीकर आणि केरबा कसारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नियोजित जागेवर फक्त ध्वजारोहण व अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता पण पाहुण्यांनी भाषणबाजी नाही तर विचार विनिमय करण्यासाठी सर्वांना मंडपात एकत्र बसण्याचे आवाहन केले. त्यानुसार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी सर्वप्रथम आपण आज येथे भाषणबाजी करणार नसून समाजाशी फक्त हितग...
error: Content is protected !!