Friday, June 26

Tag: Justice should be given to the Vadar community who built roads

Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी

Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दगड फोडून मातीकाम करून दळणवळणाचे रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती,सिंचन धरणे आणि गडकिल्ल्यांसह पर्यटन स्थळे बांधणारा वडार समाज न्यायापासून वंचित आहे. या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन न्याय द्या अशी मागणी वडार समाजाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न दगड फोडो धरणे आंदोलन करून केली आहे. रानावनाने दगड फोडून डोंगरदऱ्या कोरत मातीकाम करून दळणवळणाची रस्ते, मोठमोठी सिंचनाची धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधणारा वडार समाज आज वडार समाज नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात प्रा. साहेबराव बेळे, नागेश मेटकर, विनोद दंडलवाड, मारुती मिरेवाड यांच्या संयोजनातून आज सकल आदिवासी वडार जमात नांदेड च्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड,हिंगोली,परभणी, जालना येथील हजारो वडार युवक व प्रतिनिधी अर्धनग्न होऊन प्रतीकात्मक दगडफोडो आंदोलन केले. या आंदोलनात वडार युवकांच्या घो...
error: Content is protected !!