Friday, June 26

Tag: Journalists should see AI

Brijesh Singh : पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे – ब्रिजेश सिंह

Brijesh Singh : पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे – ब्रिजेश सिंह

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई|पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची मर्यादा आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’ चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी उपस्थित होते. ब्रिजेश सिंह म्हणाले की, मानव इतिहासात ज्ञानाचा प्रसार छपा...
error: Content is protected !!