ISO Certification of Biloli Panchayat Samiti : बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन -NNL
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. याअंतर्गत आज बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. बिलोली पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती ठरली आहे.
आयएसओ मानांकन मिळवलेल्या बिलोली पंचायत समितीच्या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. यापूर्वी नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते.
बिलोली पंचायत समितीतील आयएसओ मानांकन वितरण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमावार, सहायक गट विकास अधिकारी आर.डी. क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभ...


