Thursday, May 14

Tag: Indian Buddhists need

Indian Buddhists need to take a political role : भारतीय बौद्धांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज  -NNL

Indian Buddhists need to take a political role : भारतीय बौद्धांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज  -NNL

नांदेड, लेख
देशातील बौद्धांची संख्या किती आहे किंवा मतदान किती आहे याचा खल करीत बसण्यापेक्षा संपूर्ण देशातील विविध निवडणूकांमध्ये त्यांनी ठरवलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाप्रमाणे राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतात, हे निर्विवाद सत्य आहे. बौद्धांचे धम्मविषयक अनेक प्रश्न आहेत. भारतात तर अस्पृश्यांनी बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर तर आजच्या संदर्भानेही त्यात वाढच होत राहण्याची शक्यता आहे. धम्मस्विकारानंतर इथल्या अस्पृश्यांच्या जीवनात घडून आलेले मूल्यांतर प्रामुख्याने आचार विचार आणि वर्तनाशी संबंधित होते. शिक्षण घेणे, शासकीय नोकऱ्यांत स्थान मिळविणे म्हणजेच आपली आर्थिक स्थिती सुधारुन घेणे आणि बौद्ध म्हणून वागणे ही ढोबळमानाने असणारी ध्येय या बौद्धांसमोर होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाबरोबरच आपल्यासाठी काय काय केले, किती संघर्ष केला याची क्रांतीकारी गीतं गात वैयक्तिक तथा सामाजिक, सांस्कृतिक प्...
error: Content is protected !!