Friday, May 15

Tag: Indefinite hunger strike

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या मनमानी, बेजबाबदार व धोकादायक कारभाराविरोधात ३ फेब्रुवारीपासून सुरू असलेले अर्धनग्न आंदोलन आता ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणात रूपांतरित करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच खडकाच्या थंडीतही आंदोलनची चर्चा शहरात गरम होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव गंगाबाई लक्ष्मणराव मिराशे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, महावितरणच्या विविध गंभीर गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे असून,शहर व ग्रामीण भागात विनापरवानगी बसवलेले डीपी तात्काळ काढून उपविभाग कार्यालयात जमा करावेत, शहरातील स्थलांतरित ३३ केव्ही लाईनच्या विनापरवाना कामाची खातेनिहाय चौकशी करावी. र...
Nadwa Bridge Work : हिमायतनगर–पळसपूर नडवा पुलाचे काम निकृष्ट; 26 जानेवारीपासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे बेमुदत आमरण उपोषण

Nadwa Bridge Work : हिमायतनगर–पळसपूर नडवा पुलाचे काम निकृष्ट; 26 जानेवारीपासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे बेमुदत आमरण उपोषण

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपूर रस्त्यावरील नडवा नदीवरील पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 26 जानेवारी 2026 पासून पुलाच्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे. यापूर्वी दि. 7 जानेवारी 2026 रोजी देखील याच विषयावर तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही तांत्रिक चौकशी करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या कामामध्ये रेतीऐवजी डस्टचा वापर, अंदाजपत्रकात नमूद असलेल्या लोखंडी सळयांऐवजी 8 mm व 10 mm गजांचा वापर, गुत्तेदाराकडू...
error: Content is protected !!