Saturday, May 30

Tag: In the Nanded Zilla Parishad premises parking zone

Nanded ZP : नांदेड जिल्हा परिषद आवार पार्किंग झोन, कापड विक्रेत्याचे कायमस्वरूपी बस्तान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

Nanded ZP : नांदेड जिल्हा परिषद आवार पार्किंग झोन, कापड विक्रेत्याचे कायमस्वरूपी बस्तान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या नांदेड जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीचे आवार सध्या अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि बस्तानांनी गिळंकृत झाले असून, थेट मुख्य प्रवेशद्वारावर एका खादी कापड विक्री केंद्राने कायमस्वरूपी बस्तान ठोकल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन व बांधकाम विभाग यांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष अनेकांत तीव्र संताप निर्माण करणारे ठरत आहे. सध्या जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासकीय राज सुरू आहे. मात्र याच संधीचा गैरफायदा घेत अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. जिल्हा परिषद आवारात दोन व चारचाकी वाहनांचे शेकडोच्या संख्येने तासनतास अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. परिसरातील इतर कार्यालयांतील कर्मचारी, बाज...
error: Content is protected !!