Friday, June 26

Tag: in the Nanded division of the railways

Cleanliness Day : रेल्वेच्या नांदेड विभागात “स्वच्छता दिन” उत्साहात साजरा

Cleanliness Day : रेल्वेच्या नांदेड विभागात “स्वच्छता दिन” उत्साहात साजरा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महात्मा गांधी जयंतीनिमित्त नांदेड विभागात “स्वच्छता दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाने “स्वच्छता ही सेवा (SHS-2025)” या पंधरवडाभर चाललेल्या अभियानाचा समारोप झाला. विभागीय कार्यालयाबरोबरच विविध रेल्वे स्थानके, डेपो आणि अन्य कार्यालयांमध्येही स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विभागीय कार्यालयात स्वच्छतेची शपथ घेऊन झाली. ही शपथ श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), नांदेड यांनी दिली. त्यानंतर श्रमदान व स्वाक्षरी अभियान पार पडले, ज्यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. प्रदीप कामले यांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, शाश्वत सवयी व सामूहिक जबाबदारी यावर भर दिला. तसेच पंधरवडाभर चाललेल्या अभियानादरम्यान राबविलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली...
error: Content is protected !!