Sunday, May 31

Tag: in ration shop in Siranjani

Major scam exposed : सिरंजनीतील रेशन दुकानात मोठा घोटाळा उघड; पुरवठा अधिकारी व संबंधित दुकानदारावर कार्यवाही करा

Major scam exposed : सिरंजनीतील रेशन दुकानात मोठा घोटाळा उघड; पुरवठा अधिकारी व संबंधित दुकानदारावर कार्यवाही करा

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी गावातील स्वस्त धान्य दुकानात गंभीर अनियमितता व धान्य अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. रेशन वाटपाच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत येऊन लाभार्थ्यांशी उद्धट वर्तन करणे, पीडीएस मशीनवर अंगठा घेऊनही रेशन न देणे तसेच मोठ्या प्रमाणात धान्याचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सिरंजनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी हिमायतनगर तहसीलदारांकडे लेखी तक्रार सादर करून संबंधित रेशन दुकानदारावर व जबाबदार पुरवठा अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 151115000013 (मूळ दुकानदार विजय नागनाथ चिंतावार) हे दुकान सध्या कैलास परसराम डुडुळे यांच्याकडे संलग्न करण्यात आले आहे. मात्र, कैलास डुडुळे हे...
error: Content is protected !!