Tree plantetion : नायगांव (खै.) तालुक्यात वृक्षलागवड अन् संगोपन कागदावरच !
नांदेड, अनिल मादसवार| पर्यावरण संवर्धन, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या विविध योजना तसेच मनरेगा योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. मात्र या उपक्रमांपैकी अनेक ठिकाणी वृक्षलागवड ही केवळ कागदोपत्री राहते, तर काही ठिकाणी दर्जाहिन, थातूरमातूर काम करून निधीची उधळपट्टी केल्याचे सतत समोर येत आहे. अशाच प्रकारचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे नायगाव (खै.) तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना आला असून त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करीत धक्कादायक अनियमिततेचा भांडाफोड केला आहे.
थातूरमातूर वृक्षलागवड – जागेवर फलकही नाही! नायगाव तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा आणि कॅनाल लगत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा व निकृष्ट काम उघडकीस आले. लावलेली रोपे ठिकठिकाणी वाळलेली, संगोपनाचा कुठलाही मागमूस नाही, सर्वात महत्वाचे म्हणजे ...
