Friday, June 26

Tag: in Himayatnagar dampens Diwali joy!

Rain in Himayatnagar : हिमायतनगरात पावसाने दिवाळीच्या आनंदावर पाणी! — शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंता

Rain in Himayatnagar : हिमायतनगरात पावसाने दिवाळीच्या आनंदावर पाणी! — शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंता

कृषी, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) देशभरात दीपावलीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, हिमायतनगर तालुक्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने सणाचा उत्साह ओसरला. दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठ ओलांडून गेली, तर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ऐन पूजेच्या वेळी शहर अंधारात बुडाले. सकाळपासून बाजारपेठेत फुलं, पूजासाहित्य आणि फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी आणि ग्राहकांची एकच धावपळ उडाली. ओलसर वातावरणामुळे फुलं व पूजासाहित्याचे नुकसान झाले, तर नागरिकांना पावसातून घरी पोहोचणं कठीण झालं होत. शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंता तालुक्यातील शेतकरी वर्गावर आधीच अतिवृष्टीचे सावट आहे. यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे निर्माण झाले असून, पिके चिखलात अडकून गुणवत्तेत घसरण झाली आहे....
error: Content is protected !!