Illegal sand mining : तहसीलदार परळीकर यांची धडक कारवाई — चिंचोली-येळी परिसरातील अवैध वाळू उपसा बंद
लोहा| लोहा तालुक्यातील महाटी, चिंचोली-येळी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस पथकाने गुरुवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत वाळू उपशासाठी वापरली जाणारी दोन इंजिने व फायबर बोटी जप्त करून त्यांना जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू होता. लोहा शहरात बिना नंबरच्या हायवा गाड्यांद्वारे उघडपणे वाहतूक होत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने गंभीर दखल घेत अचानक सापळा रचत परिसरात छापा टाकला. प्रशासनाचे वाहन पाहताच वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठी पळापळ उडाली.
पथकाने घटनास्थळी आढळलेली दोन इंजिने ...
