Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Former MLA Madhavrao Patil Javalgaonkar) यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.
अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरांची पडझड झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू भिजून खराब होऊन गेल्या आहेत.
दरम्यान, इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, गावोगावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची माहिती ...
