Friday, June 26

Tag: Honoring voters who refused money

Honoring voters : पैसे नाकारणाऱ्या मतदारांचा सत्कार : लोकशाही जपण्याचा धाडसी उपक्रम

Honoring voters : पैसे नाकारणाऱ्या मतदारांचा सत्कार : लोकशाही जपण्याचा धाडसी उपक्रम

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| मतदानासाठी घरी पैसे येऊनही त्यांना ठाम नकार देणाऱ्या प्रामाणिक आणि निर्भय मतदारांचा नांदेडमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. ‘जसा मतदार तसा नेता’ या लोकशाही मूल्ये जपणाऱ्या उपक्रमामुळे समाजात आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, मतविक्रीच्या प्रवृत्तीला थेट आव्हान देण्यात आले आहे. सध्याच्या काळात मतदानासाठी पैसे घेण्याची प्रवृत्ती वय, जात, धर्म, शिक्षण, सामाजिक दर्जा अशा सर्व भेदांवर मात करत समाजात खोलवर रुजलेली दिसून येते. मतदानासाठी पैसे घेणे हे कायद्याने गुन्हा, नैतिकदृष्ट्या चुकीचे व लोकशाहीस घातक असले, तरी अशा घटना सर्रास घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर “मी मतदानासाठी पैसे घेतले नाहीत” असे ठामपणे सांगणाऱ्या मतदारांची संख्या अत्यल्प होत चालल्याची चिंताजनक स्थिती आहे. अशाच निराशाजनक वातावरणात दि. 13 जानेवारी 2026 रोजी मतदानासाठी पैसे देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना पैसे नाकारून त्...
error: Content is protected !!