Friday, June 26

Tag: Holi Special! Today

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

नांदेड, मनोरंजन
नांदेड| होळी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी द्विअर्थी कव्वालीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे सिने गीतकार व गायक एकनाथ माळी (पार्टी पनवेल) विरुद्ध महाराष्ट्राची ‘डेंजर फटाकडी’ गायिका ज्योती शिंदे (पार्टी नवी मुंबई) यांच्यात रंगणाऱ्या या सामन्यामुळे रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉ. जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे. उद्घाटन व मान्यवर उपस्थिती महामूर्ख कवी संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी नेते बाबुर...
error: Content is protected !!