Thursday, May 28

Tag: Grand Shankar Pat competition

Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण

Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरात दिनांक २५, २६ व २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य शंकर पट स्पर्धेचे उद्घाटन हदगाव–हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त शंकर पट समितीच्या वतीने आमदार कोहळीकर यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले. दि. २० फेब्रुवारी रोजी श्री परमेश्वर देवस्थान येथे आयोजित दहीहंडी व ह.भ.प. नारायण महाराज गरड यांच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्या दरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कोहळीकर यांची भेट घेऊन स्पर्धेचे निमंत्रण दिले. आमदारांनी स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कोशाध्यक्ष प्रवीण शिंदे, सेक्रेटरी श्याम पाटील, सहसेक्रेटरी गजानन हार्डफकर, विठ्ठल च...
error: Content is protected !!