Deputy Collector Anup Patil : आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे – उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, तिचे काटेकोर पालन करणे ही सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केले.
ते नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत देगलूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भातील निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “आचारसंहिता ही केवळ प्रशासनिक बंधन नसून, लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पाया आहे. तिचे पालन करणे प्रत्येक नागरिक, उमेदवार आणि पक्षाची जबाबदारी आहे.”
या वेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलम कांबळे, तसेच पोलीस निरीक्षक मार...
