Friday, June 26

Tag: Ensure that law and order is maintained

District Collector Rahul Kardile : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी,  मुदखेड, लोहा नगरपरिषद तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत निवडणूक सनियंत्रण समितीची आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, न...
error: Content is protected !!