Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
नांदेड| कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, लातूरचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नाना सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ‘मैत्री’ व नॅशनल डेअरी स्कीम अंतर्गत कार्यरत सेवादाते उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील पशुप्रजनन कार्य, दुग्ध उत्पादन वाढ तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच किसान क्रेडिट कार्ड योजना, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रजनन...

