Zilla Parishad Nanded ; डिजिटल मित्र पोर्टल- जिल्हा परिषद नांदेडचा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी सुलभ, जलद व पारदर्शक सेवा एका क्लिकवर उपलब्ध
नांदेड l 21- नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने डिजिटल मित्र पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह विविध विभागांच्या योजना आणि सेवा नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना घरी बसून शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि शासनावरील नागरिकांचा विश्वास वाढणार आहे. योजनांबाबत माहिती व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात पाहता येणार आहेत. या पोर्टलवर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून तक्रारी, मागण्या व निवेदन सादर करण्याची सोयही या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती 48 तासांत ऑनलाईन तपासता येईल...
