Cinematographer Sankarshan Kharhade ; कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे – NNL
नांदेड| कला क्षेत्रात करिअर करायची असेल तर कलावंतांनी अष्टपैलू राहिले पाहिजे. कलावंतांमध्ये सातत्य, मेहनत असावी लागते. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचे मैदान सोडून जाऊ नये, यश आणि अपयश मनाला लावून घेऊ नये, अपयश हे आपल्यासाठी आवाहन आहे, असे मत सिने कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून घडलेला मी कलावंत असून, मी मराठवाड्याचा कलावंत असल्याचे माझी ओळख आहे. मुंबईमधील आणि मराठवाड्यातील कलाकारांमध्ये फरक आहे. मराठवाड्यातील कलावंत प्रामाणिक आणि साधे असतात असा माझा अनुभव असल्याचे सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
...
