Himayatnagar City uncleanliness : शहरातील दुर्गंधी, अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि प्रशासनाचे दुर्लक्ष — निवडणुकीत नागरिकांचा रोष उफाळला
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत 2025 ची सार्वत्रिक निवडणूक जोरात सुरू असताना शहरात मूलभूत नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे. शहरातील चौक-चौकात दुर्गंधी, नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर, साचलेली घाण आणि अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
प्रचारात मग्न उमेदवार, पण समस्या दुर्लक्षित - प्रत्येक वार्डात उमेदवारांची प्रचारफेरी सुरू असली तरी शहराचे विदारक वास्तव त्यांच्या नजरेस पडत नाही का? असा सरळ सवाल नागरिक विचारू लागले आहेत. नेत्यांचे लक्ष गगनचुंबी आश्वासनांकडे; पण आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा यासारख्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही हे शहराचे दुर्दैव असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
पंचवार्षिक काळात विकासाऐवजी दुरवस्था? - गेल्या पाच वर्षांत शहराचा रस्ते, नाले, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा या सगळ...
