Sunday, June 28

Tag: CEO turns a blind eye

Usmannagar : उस्माननगर येथील निवेदनाकडे सिईओ यांचा कानाडोळा; महिनाभरानंतरही चौकशीला सुरुवात नाही!

Usmannagar : उस्माननगर येथील निवेदनाकडे सिईओ यांचा कानाडोळा; महिनाभरानंतरही चौकशीला सुरुवात नाही!

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर,माणिक भिसे| उस्माननगर (ता. कंधार) ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांतील गैरव्यवहाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिक नागरिकांत व्यक्त होत आहे. महिनाभर उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने निवेदनदारांनी नुकतीच सीईओ यांची भेट घेऊन याबाबत विचारपूस केली. ग्रामपंचायत उस्माननगर येथील दलित वस्ती सुधार योजना आणि १५ व्या वित्त आयोग निधीमधून करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी गजानन सूर्यवाड यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनात तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी बोगस कामे करून शासनाची दिशाभूल केली व लाखो रुपयांचा निधी हडप केला, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. या कामांची तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करून चौकशी केल्य...
error: Content is protected !!