Friday, June 26

Tag: by jumping in front of a train

Nanded Murdered : आर्थिक नैराश्यातून मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; नंतर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Nanded Murdered : आर्थिक नैराश्यातून मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; नंतर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

क्राईम, नांदेड
नांदेड | जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा अखेर बारड पोलिसांनी उलगडा केला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून पोटच्या दोन मुलांनीच आपल्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मुगट रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी मुगट रेल्वेस्थानक परिसरात जवळा मुरार येथील उमेश रमेश लखे (२५) व बजरंग रमेश लखे (२२) या दोन तरुणांचे मृतदेह रेल्वेखाली आढळून आले होते. तर त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (५५) व आई राधाबाई रमेश लखे (४८) यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात जवळा मुरार येथे आढळून आले होते. सदर घटना दि. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून दुसऱ्या दिवशी सकाळी ती उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही घटना घात आहे की ...
error: Content is protected !!