Friday, June 26

Tag: broke the bottles

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव (पूर्व) येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उसळला. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांनी कारवाई करत दारू विक्रेत्यांचा भांडाफोड केला, देशी दारूच्या बाटल्या फोडल्या आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावात गेल्या काही दिवसांपासून दिवसा ढवळ्या अवैध देशी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे गावात तळीरामांचा हैदोस वाढला होता आणि महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रार व निवेदन दिले होते. मात्र कारवाई न झाल्याने दारू विक्रेत्यांचा धंदा सुरूच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासारख्या धार्मिक कार्यक्रमातही दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या घटन...
error: Content is protected !!