Friday, June 26

Tag: BJP-Shiv Sena alliance to be sealed soon! First round of negotiations positive

politics : भाजप-शिवसेना महायुतीवर लवकरच शिक्कामोर्तब! वाटाघाटीची पहिली फेरी सकारात्मक

politics : भाजप-शिवसेना महायुतीवर लवकरच शिक्कामोर्तब! वाटाघाटीची पहिली फेरी सकारात्मक

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना या महायुतीमधील दोन घटक पक्षांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत असून, या संदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मनपा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नांदेड मनपासाठी दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये भाजपकडून महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, खा. अजित गोपछडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांचा समावेश आहे; तर शिवसेनेकडून आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर तसेच विनय गिरडे, उमेश मुंडे, गंग...
error: Content is protected !!