BJP government’s : भाजप सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे – भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख
हदगाव, शेख चांदपाशा| देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल झाले असून अनेक योजना आहेत याची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. असे प्रतिपादन भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी केले.
शनिवारी हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात भाजप तालुका व शहर मंडळाच्या " संवाद" बैठकीत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माधवराव पाटील उच्चेकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देश सुरक्षित व प्रगतिशील बनला आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की डॉक्टर, अभियंते, शिक्षक, व्यापारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते हे थेट जोडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी केली.
भाजपा अध्यक्ष देशमुख यांनी काँग्रेसच्या काळातील परिस्थितीची आठवण करून देताना सांगितले की, पूर्वी सामान्य माणसाला घरासाठी शासकीय कार्...
