Bhaurao : सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कारखाना म्हणून ‘भाऊराव’ सन्मानित
नांदेड l यावर्षी संपूर्ण देशभर सहकार शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सहकार मंथन २०२५ अंतर्गत यावर्षीचा सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृट साखर कारखाना पुरस्कार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे येळेगाव ता. अर्धापूर व डोंगरकडा जि.हिंगोली येथे दोन युनिट कार्यरत आहेत. ऊस उत्पादक शेतक-यांचे हित जोपासण्याची भूमिका या कारखान्याची कायम राहिली आहे. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबदल यावर्षीचा उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार सहकार मंथन २०२५ या पुणे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सहकार आयुक्त डॉ. सं...
