Bag forgotten – मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग मिळाली परत; नांदेड दमरे जनसंपर्क विभागाची तत्परता -NNL
नांदेड। रेल्वे प्रशासनाशी संबंधीत अनेक समस्यांबाबत नेहमी ओरड असली तरी काही वेळा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत सोडवणूकही केली जाते असा अनुभव नांदेडच्या एका महिला प्रवाशाला आला आहे. मराठवाडा एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत डब्ब्यात छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला विसरलेली बॅग परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच रेल्वेस्थानकावर संबंधीत प्रवाशास जशास तशी परत मिळाल्याने रेल्वे प्रशासनाच्या या सेवेबाबत सुखद अनुभव आला आहे.
नांदेडच्या रहिवासी सौ.अंजली गिरीश बाऱ्हाळे या सध्या नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरला भाग्यलक्ष्मी बँकेत कार्यरत आहेत. काही दिवसांच्या सुटीनंतर त्या दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी नांदेडहून गाडी क्रमांक १७६८८ मराठवाडा एक्स्प्रेसच्या सी २/५२ या वातानुकुलीत डब्यातून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला रवाना झाल्या. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला सकाळी १० च्या सुमारास उतरताना त्यांची ए...
