Leopard Spotted Vadepuri : नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
नांदेड, अनिल मादसवार| राज्यभरात वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत असताना, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ऑटोचालकानं टिपला बिबट्या!
मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑटो चालक माता रत्नेश्वरी मंदिरातून खाली येत असताना त्याला रस्त्यावर बिबट्या दिसला. ऑटो चालकानं तत्काळ त्या क्षणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला आणि ही माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी केशव वाबळे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि प्रथमदर्शनी बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी केली.
वन विभागाची खातरजमा:
वडेपुरी शिवारात बिबट्याच्या हालचालींची खात्री करण्यासाठी वन विभागाचं विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं. माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी असलेल्य...
