Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे
नांदेड| जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या भांडयात किंवा पारदर्शक अन्न श्रेणी प्लॉस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावा. जेणेकरुन प्रसादाला धुळ, माती, माशा, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्न पदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वछ असावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने /हँड वॉशने धुवुनच कामास सुरुवात करावी. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुंकणे तंबाखू वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्...
