Loha Municipality : लोहा नगरपालिका : पवार–मुकदम सहाव्यांदा तर धुतमल पाचव्यांदा प्रभावी ; पहिल्यांदाच १६ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
लोहा| लोहा नगर पालिका निवडणुकीत पारंपरिक शक्तिसमीकरणांना धक्का बसत तीन दाम्पत्यांचा पराभव झाला, तर पवार–मुकदम कुटुंबांनी सहाव्यांदा आणि धुतमल कुटुंबाने पाचव्यांदा सभागृहात पुनरागमनाची नोंद केली आहे. यावेळी तब्बल १६ नवीन चेहरे पहिल्यांदाच नगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाले आहेत.
१९९८ नंतर तब्बल २७ वर्षांनी पवार पाटील परिवाराच्या हाती पुन्हा नगरपालिकेची सूत्रे गेली. ‘पवार’ आडनावाचे चार सदस्य, ‘काकू–पुतणी’ जोडी आणि धुतमल परिवारातील दोन सदस्य अशा कुटुंबीय राजकारणाच्या प्रभावी नोंदी यंदाच्या निवडणुकीत उमटल्या.
नगर पालिकेच्या स्थापनेनंतर २००८ चा अपवाद वगळता माजी सभापती व्यंकटराव मुकदम यांच्या कुटुंबाने सहा वेळा नेतृत्व केले आहे. माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम तीन वेळा तर माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी तीन कार्यकाळांचे प्रतिनिधित्व केले आहे. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या...
