Thursday, June 25

Tag: नांदेड

नांदेड बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासाची गरज; प्रवाशांकडून सुविधा सुधारण्याची अपेक्षा

नांदेड बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासाची गरज; प्रवाशांकडून सुविधा सुधारण्याची अपेक्षा

महाराष्ट्र, नांदेड
आधुनिक बससेवेला स्वच्छ, सुसज्ज आणि प्रवाशाभिमुख बसस्थानकाची जोड आवश्यक नांदेड,गोविंद मुंडकर| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या काही वर्षांत प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी वातानुकूलित बस, डिजिटल सुविधा आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो प्रवाशांना सुरक्षित व परवडणारा प्रवास उपलब्ध झाला आहे. मात्र या सकारात्मक बदलांना नांदेड बसस्थानकाच्या सुविधा आणि परिसराच्या विकासाची जोड मिळाल्यास प्रवाशांचा अनुभव अधिक समाधानकारक ठरू शकतो. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नांदेड बसस्थानक हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे येथे स्वच्छता, अचूक माहिती व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. ...
error: Content is protected !!