नांदेड| जागतीक आदीवासी क्रांती दिनानिमित्त गुरुवारी दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी बोगस आहेत असा शब्द वापरणारे आ नरहरी झिरवळ, आ.डॉ किरण लाहामटे ,लकी जाधव यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि आदिवासी मंत्री यांच्यासोबत फक्त कोळी समाजाच्या हितासाठी घटनेप्रमाणे समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परत बैठक बोलवावी आणि कोळी नोंदीवरून जातीचे दाखले आणि जात वैधता मिळावी अशा सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शंकरराव मनाळकर कोळी महासंघ मराठवाडा अध्यक्ष, मारुती पटाईत माजी नगराध्यक्ष, राम मालेवाड जिल्हाध्यक्ष, अशोक गझलवाड, दिलीप रेनेवाड, साई विभुते, के एन जेठेवाड, इंद्रजीत तुडमे, आनंदा रेजीतवाड, लक्ष्मण नागरवाढ, लक्ष्मण पिटलवाड, विश्वनाथ जटाळे, ज्ञानेश्वर मर्कंटे, प्रल्हाद मध्येवाढ, भारत गव्हाणकर, प्रशांत गड्डमवाड, मारुती फस्कलवाड, केशव कोकुलवाड, गंगाधर अंपलवाड, शंकर मूतकुलवाड, भगवान गुंजलवाड, कल्याण मोळके, गिरीष गलांडे, लक्ष्मीबाई घोरपडे, एडवोकेट चंद्रकलाबाई जेटवाड, शंकर मदेवाड, शंकर गजेवाड, ज्ञानेश्वर संकेवाड, श्रीराम गलांडे, रामचंद्र मोळके, बालाजी पेटकर, प्रभाकर केंगल, केरबा तुरटवाड, मोहित रेडेवाड, रंगनाथ राजेलवाड, श्यामराव बटेवाड, विठ्ठल ममिलवाड, शैलेश पिल्लेवाड, बाबू मोरे, भालचंद्र मोळके, गंगाधर पिटलेवड, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या धरणे आंदोलनानंतर मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड व भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या उपस्थितीत सर्व बांधवांनी नांदेडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.