नांदेड l प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचलित वसरणी येथिल निवासी अंध विद्यालय येथे सकाळी सौ सत्यश्री गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी करण्यात आले या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
यावेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत घेण्यात आले ,त्याच बरोबर संविधान प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले , सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश खाडे ,केंद्रे व मान्यवर उपस्थित होते. शाळेनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा केमिस्टचे अध्यक्ष भाजपा कार्यकारिणी सदस्य दीपकजी कोठारी हे होते प्रमुख पाहुणे माजी पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव वरपडे व फार्मासिस्ट राजेश बालाजीराव बुलबुले तसेच सगरोळी येथील सैनिक शाळेचे माजी मेजर गंगाधर शिक्षक हे होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
अंध विद्यार्थ्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संगीत शिक्षक पंकज शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीत, भावगीत, भक्तीगीत. गवळणी. भारुड अशी गीते सादर केली तसेच विविध विषयावर भाषण झाली यावेळी कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांची भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्षविठ्ठलराव गुट्टे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
यांनी विध्यार्थी यांना मार्गदर्शन केले यावेळी डायरेक्टर नागेश गुट्टे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या झाली हा कार्यक्रम यशस्वीते साठी संजय पाटील,वसुधा निकम. भास्कर सर. सुरेश होळंबे,बलभीम केंद्रे,मनोज कलवले. संतोष सावते. नागनाथ कुच्चेवार. नामदेव इंगळे. आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक बाबाराव इबितवार यांनी प्रास्ताविक तर रामराव जोजार यांनी परिश्रम घेतले.