लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात ३३८ मतदान केंद्र आहेत त्या केंद्रावर किमान मुलभुत सोईसुविधा उपलब्ध करुनदेण्यात याव्यात पुरेशी प्रकाश व्यवस्था,पिण्याचे पाणी शिपाई,शौचालय, प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी यासह निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्य.सुविधा। बीडीओ, बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग, बिईओ, तालुका आरोग्य अधिकारी या विभागाने पुरवाव्यात असे निर्देश लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिले आहेत
लोहा कंधार तालुक्यचे गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बाधकाम विभाग, पाणी पुरवठा , बिईओ, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान केंद्रावर भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत याचे लेखी पत्र काढले आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदार केंद्राला
निवडणुक निरीक्षक अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत सदर मतदान केंद्रावर खालील बाहेरच्या बाजुला प्रकाश, मतदान केंद्रावर प्रकाशाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
मतदान दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंधार होणार नाही याची काळजी घ्यावी .कर्मचारी व मतदार यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी शौचालय व परीसराची स्वच्छता व्हावी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांकरीता स्वच्छ शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा मतदारांसाठी उपलब्धकरुन दयावेत.
फर्निचरची व्यवस्था मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेले अधिकारी / कर्मचारी यांना व उमेदवारांना बसण्यासाठी तसेच मतदार प्रक्रीया व्यवस्थीत रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक टेबल व पुरेसे फर्नीचरची व्यवस्था करावी. वयोवृध्द व दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प सुव्यवस्थित करावेत.जेथे सुविधा नसतील त्या मतदान केंद्रावर मुलभुत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन सूचना द्यावेत सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे अहवाल, दोन दिवसात या कार्यालयास सादर करावे असे आदेश लेखी देण्यात आहेत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय / त्रुटी आढळुन येणार नाही याची दक्षता घ्यावी.
अन्यथा आपल्यावर जबाबदारी निश्चीत करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर,निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे,निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे उपस्थित होते