उस्माननगर| शिराढोण ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण ता.कंधार येथील ज्येष्ठ नागरिक तथा सरपंच , ग्रामसेवक , शिक्षक इंजिनिअर यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार सन्मान करून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पृथ्वी , वायू , जल , आग्नी , आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत ‘ माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील २२२१८ ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता.यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये शिराढोण ता.कंधार जि.नांदेड येथील ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिराढोण ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक म्हणून ५० लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
शिराढोण ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिराढोण चे सरपंच प्रा.खुशाल पाटील पांडागळे , ग्रामविकास अधिकारी मुंजाळ साहेब , उपसरपंच पांडुरंग पवार ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , कर्मचारी,सेवा सहकारी सोसायटीचे संचालक व गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक ,तथा शिराढोणचे भुमीपुत्र उत्तमराव गायकवाड सर, शिराढोण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक बाबाराव विश्वकर्मा सर, बांधकाम क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल उस्माननगरचे इंजिनिअर प्रतिक देशमुख यांचा शिराढोण ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी शिराढोणचे माली पाटील व्यंकटराव पांडागळे होते.तर कार्यक्रमास मा.सरपंच गणपतराव आप्पा देवणे , चेअरमन माधवराव पाटील कपाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे , युवा नेते देवराव पा.पांडागळे ग्रामपंचायत सदस्य सदानंद भुरे , शिवाजी गायकवाड , प्रतिनिधी मुक्ताराम पा.पांडागळे, प्रकाश चौडम, मनोज जमदाडे, मा.सदस्य किशनराव राठोड, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गोविंद पा.कपाळे, ईश्वर पा.पांडागळे , साईनाथ केते सर सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दौलत पांडागळे यांनी केले तर आभार गजानन देवणे सर यांनी व्यक्त केले.