उस्माननगर l समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परिसरातील सेवानिवृत्त कॅप्टन , सैनिक , ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करून उत्सवात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तथा शिराढोण येथील सेवानिवृत्त कॅप्टन कीशन कपाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी दिपक कपाळे (सेवानिवृत्ती आर्मी जवान)व.व्यंकट भगवान पा.ताटे (सेवानिवृत्ती आर्मी जवान) यांच्या सह ज्येष्ठ नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेच्या वतीने सहसचिव- तु.शं.वारकड गुरूजी, कोषाध्यक्ष- अनिरूद्ध सिरसाळकर,मु.अ.-गोविंद बोदेमवाड,पर्यवेक्षक- राजीव अंबेकर यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मु.अ.गोविंद बोदेमवाड हे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने शाळेतील अखेरचा ध्वजारोहण असल्या मुळे त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आजच्या दिना चे महत्त्व मु.अ.गोविंद बोदेमवाड यांनी विशेद केले. यावेळी गावातील प्रतीष्ठीत नागरीक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक-राजीव अंबेकर यांनी केले