Wednesday, May 13

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयात गांजा विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून आज विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात छापा टाकला असता 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या घटनेमुळे गांजा तस्करात खळबळ उडाली आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 08/06/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री एम.डब्लु. दिगल...
गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। गावठी पिस्टल बाळगुन तीची विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वजीराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गावठी पिस्टल, 05 जिवंत काडतुस असा एकुण 1,22,500/- रुपयाचा ऐवजसह अटक केली आहे, पोलिसांच्या धडाकेबाज कार्यवाही बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. नांदेड जिल्हयामध्ये गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचे दृष्टीने ) श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड शहर, ) सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग ईतवारा नांदेड यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देऊन त्यांना नियमीतपणे चेक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने आज दिनांक 07.06.2024 रोजी परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे व...
अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून मुखेडात दोन गटांत तलवारीने हल्ला; 3 जण गंभीर; पोलीस दाखल -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/मुखेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून दोन गटात तू तू-मै मै होऊन वाळूमाफियांनी तलवारी व खंजरने जोरदार हल्ला केला. यात मुखेड येथील तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन पोलीस उपअधीक्षक अबिनाशकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात कुठलाही नोंद झाली नसली तरी उशिरा याबाबत गुन्हा दाखल होईल असे सांगितले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन तीन युवकांनी सकाळी शुक्रवारी थांबून ठेवले होते. यावरून वाळूमाफियांमध्ये वाद झाला. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी तलवारी, रॉड व खंजरने मारहाण केली. यामध्ये दोघांचे बोटे तुटली असू...
आष्टा फाटा येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी -NNL

आष्टा फाटा येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता उघडकिस आली आहे. 'त्या' जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी केली असून पोलीस प्रशासनाकडून जनतेला मयत महिलेबद्दल माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे... याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात दाखल आ .मृ. क्र. १०/२०२४ कलम १७४ सी. आर.पी. सी. अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात एक अनोळखी स्त्री जातीचे महीला वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे जिची उंची ५ फुट रंग सांगता येत नाही.. केस जळालेले.. नाक आखुड छोटे...शरीर बांधा सडपातळ, अंगावरील कपडे :- अर्धवट जळालेल्या अवस्थेत लाल रंगाचे परकरचा तुकडा, अर्धवट जळालेला ...
वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी व बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा- या वाहन चालकावर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब व मा. अपर पोलीस श्री. अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी वेळोवळी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशित केले होते. मा. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या 13014 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचेकडून 1,39,82400/-रु (एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपय) दंड केला शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी लोकसभा निवडणुक- 2024 अनुषंगाने नांदेड शहरात VVIP प्रचार सभा बंदोबस्त, निवडणुक बंदोबस्त, तसेच रमजान ईद, श्री रामनवमी, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती महत्वाचे बंदोवस्त करीत असतांना दि. 12/03/2024 ते दि. 05/06/2024 या कालावधीत शहरात वाहतू...
अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली आहे. माहूर पासुन ९ कि,मी, अंतरावर असलेल्या माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील मेन रोड वर असलेल्या आष्टा फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांच्या शेतात रोड वरुन २०० मिटर अंतरावरा त्याच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प-याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच स्पिंकलरची पाईप व नोझल ठेवलेले होते व,तेथे रात्री ९ वा मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने शेत मालक शेतात आले , व आग विझवण्याचा प्रयत्न केला सर्व आग विझल्यावर अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळावर माहूर पोलीस ठाण्याचे स...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील बिलोली येथिल मा. तदर्थ जिल्हा न्यायधीश-१ तथा अति. जिल्हा न्यायाधीश बिलोली श्री. व्ही. ब. बोहरा यानी आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड, वय: 50 वर्षे, रा. अजनी, ता. बिलोली, जी. नांदेड यास *कलम 376(2)(N), भा.द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 25,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम 506 भा.द. वि. अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 5,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित मुलगी ही आई लहनपणी वारली असल्याममुळे आणि वाडिलानी दुसरे लग्न केले असल्यामुळे मामाच्या गावी अजनी ता. बिलोली येथे अजी आजोबा आणि मामा सोबत राहत होती. माहे ऑक्टोबर 2020 मध्ये पीडितेची मावशी बाळंतपनासाठी माहेरी आजनी येथे आली व दिनांक 28/11/2020 रोजी पीडित मुलीची मावश...
चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त -NNL

चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेवरून नांदेडच्या वजीराबाद गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त केले आहे. याबाबा सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उप विभाग सहा. पोलीस अधीक्षक किरितिका सी.एम. यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार व त्यांच्या हालाचालींवर लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मोबाईल चोरीचे गुन्हेगारांना अटक करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. मागील काही दिवसात बसस्थानक व रेल्वेस्टेशन परीसरा मधुन मोबाईल फोन चोरीस / गहाळ होत असल्याबाबतच्या तक...
6 जून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

6 जून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 6 जूनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे ...
वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाटसुरूची लूटमार करून मोबाईल पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या दरोडेखोराना हिमायतनगर पोलिसांनी दोन मोबाईल, दुचाकी व नगदी रक्कम मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून मुसक्या आवळल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे, हि कार्यवाही पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 18/05/2024 रोजी फिर्यादी यांचे जबाबवरून पो.स्टे. गुरनं. 108/२०२४ कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2024 रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड येथे चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल आडवुन मोबाईल व पैसे...
error: Content is protected !!