उस्माननगर, माणिक भिसे l मारतळा ( ता. लोहा ) येथील नांदेड – हैदराबाद महामार्गावरील मुख्य बाजारपेठेतील खासगी एटीएम फोडून रोख रक्कम पळविण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला . पण शेजारी असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर फोडून ५० हजार, व ७ हजाराचा मोबाईल असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल चोरटयानी पळविल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.


मारतळा येथील मुख्य बाजारपेठेतील खासगी एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून फसला. मात्र एटीएम मशीनची चोरट्यांनी मोडतोड करून मोठे नुकसान केले. तर शेजारीच असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर तोडून गल्ल्यातील ५० हजार व एक ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला असून घटनास्थळी श्वान व ठसे तज्ज्ञांनाचे पथकाला पाचारण करण्यात आले होते.


श्वानाने कांहीं अंतरापर्यंत माग काढला , मार्केटमधील एका दुकानासमोर तो घुटमळला . याप्रकरणी फिर्यादी विकास भास्करराव सावळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश मुळीक हे करीत आहेत .
