नांदेड| ओळखीचे पुरावे असतानाही परिक्षेला बसू न दिल्याची तक्रार ग्रामसेवक पदासाठी परीक्षा देणार्या उमेदवार मिनाबाई सूर्यवंशी यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
दि.29 जुलै रोजी सहयोग कॅम्पस येथे ग्रामसेवक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान परिक्षेसाठी आलेल्या काही महिला उमेदवारांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखीचे पुरावे असतानाही पॅनकार्डवर पतीचे नाव वर आणि वडिलांचे नाव खाली असल्याच्या कारणावरुन परिक्षेत बसू देण्यात आले नाही.
या प्रकारबाबत विचारले असता परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी उलट महिला उमेदवारांशी हुज्जत घातली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन ग्रामसेवक पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी मिनाबाई सूर्यवंशी यांनी सुरवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी निवेदन न स्वीकारल्याने त्यांनी जिल्हाधिकार्यांना भेटून निवेदन दिले.