HomeनांदेडNanded News : नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग

Nanded News : नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग

नांदेड | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते (Sadanand Date) यांची भेट घेऊन नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या बैठकीत नांदेड शहरात ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा झाली. या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण (shrijaya Chavan) यांनी बैठकीत तालुका मुख्यालयांच्या शहरांचाही सेफ सिटी प्रकल्पात समावेश करण्याची सूचना मांडली. त्यानुसार भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या शहरांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा उभारून हा प्रकल्प राबविण्याची मागणी त्यांनी केली.

या चर्चेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय तसेच ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’साठी शासन स्तरावर पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. बैठकीस पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक (Suvez Haque) हेही उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments