Homeक्राईमillegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १...

illegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केली असून रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता पोलिस ठाणे मुदखेड हद्दीतील माळाकोठा परिसरात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचे दोन डंपर, एक JCB मशीन, एक जनरेटर आणि रेतीने भरलेले डंपर असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

IMG 20260307 WA0022 illegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पोलिस ठाणे मुदखेड येथे गुन्हा क्रमांक ३९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी केलेल्या पाहणीत माळाकोठा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा करून साठवणूक व वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

IMG 20260307 WA0021 illegal sand smuggling : नांदेडमध्ये अवैध रेती तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप घारकोसे, पौफेलसिंग जिकलवाड, गणेश भोसले आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी अवैध व्यवसायाची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ९१ ५०५८ १०० १०० या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments